Share

पंढरपूर पोटनिवडणुक : वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री , ‘हा’ उमेदवार रिंगणात

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

परंतु आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदावार जाहीर केला आहे. वंचितकडून पंढपूर पोटनिवडणुकीसाठी विरप्पा मोटे यांच्या नावाची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ही निवडणूक वंचित पूर्ण ताकदीने लढणार आहे. मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनीही भाजप विरोधात एल्गार पुकारला आहे. यामुळे भाजपचे समाधान अवताडे यांच्यासाठी देखील ही लढाई सोपी नाही.त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढाची ही पोटनिवडणुक चांगलीच चुरशीची होणार एवढे मात्र नक्की आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!