🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. परमबीर सिंग यांच्यावतीने वकील विक्रम ननकानी तर डव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे.
पत्रामध्ये परमबीर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मोहन डेलकर प्रकरणी देखील अनिल देशमुख हस्तक्षेप करत असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यावर न्यायमूर्तीनी परमबीर सिंह यांनाच खडेबोल सुनावले आहेत.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपसह परमबीर सिंह यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांमुळे भक्तांचा डाव विस्कटत चाललाय. भक्तांच्या बुद्धिबळातील घोडा अडीच घराची चाल सोडुन नाहक भलतीकडे फिरकल्याने या “परमवीर” घोड्याचे रूपांतर ‘शरमवीर’ मध्ये होऊन भक्तांची तोंडं काळी व्हायला सुरुवात झाली आहे.’ अशी टिप्पणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांमुळे भक्तांचा डाव विस्कटत चाललाय.भक्तांच्या बुद्धिबळातील घोडा अडीच घराची चाल सोडुन नाहक भलतीकडे फिरकल्याने या "परमवीर" घोड्याचे रूपांतर 'शरमवीर' मध्ये होऊन भक्तांची तोंडं काळी व्हायला सुरुवात झाली आहे.
उघडा डोळे बघा नीट.@ABPNews pic.twitter.com/32eADFRUcS— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 31, 2021
न्यायालयाने परमबीर सिंहांना झापलं !
सरकारतर्फे युक्तिवाद करताना आशुतोष कुंभकोणी यांनी परमबीर सिंह हे जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. मी जर चूक असेल तर शिक्षा करा असं सांगण्यास ते तयार नाहीत. जे आरोप करण्यात आले ते फक्त ऐकलेल्या गोष्टींवर करण्यात आलेत असा युक्तविाद कुंभकोणी यांनी केला.
यानंतर, ‘तुम्ही पोलीस अधिकारी आहात. जेव्हा एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते तेव्हा एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. मात्र, तुम्ही तसे का केला नाही ?’ असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी परमबीर सिंह यांना केला आहे. तसेच,’ जर एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. परंतु पोलिस अधिकारी म्हणून गुन्हा घडतोय हे माहिती असूनही एफआयआर दाखल केलेला नाही, हे तुमचं अपयश आहे,’ असे खडेबोल देखील न्यायमूर्तींनी सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पंतप्रधान एचडी देवगौडा आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण ट्वीट करत दिली माहिती
- शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; नाराज भास्कर जाधवांची लागली वर्णी
- ‘परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे’
- एचडीएफसी बँक ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरताना अडचणी; बँकेने दिल आश्वासन
- ‘गोकुळ’चा संचालक व्हायचं असेल तर एका दमात दहा लिटर दूध काढून दाखवा – राजू शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

