🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे व भाजपाला सडेतोड उत्तर देणारे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेनं आक्रमक बाणा कायम ठेवल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या चेहऱ्यांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. याशिवाय परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर, मंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज असणारे भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्त्यांची यादी –
०१} संजय राऊत : राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
०२} अरविंद सावंत : खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
०३} प्रियंका चतुर्वेदी : राज्यसभा खासदार
०४} ऍड. अनिल परब : परिवहन मंत्री
०५} सचिन अहिर : शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
०६} सुनील प्रभू : आमदार (मुंबई)
०७} प्रताप सरनाईक : आमदार (ठाणे)
०८} भास्कर जाधव : आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
०९} अंबादास दानवे : विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
१०} मनिषा कायंदे : विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
११} किशोरी पेडणेकर : महापौर (मुंबई)
१२} शीतल म्हात्रे : नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)
१३} शुभा राऊळ : माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
१४} किशोर कान्हेरे : (नागपूर) (नवीन वर्णी)
१५} संजना घाडी : (नवीन वर्णी)
१६} आनंद दुबे : (मुंबई) (नवीन वर्णी)
दरम्यान, नव्या यादीत खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना स्थान मिळालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते – नितेश राणे
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

