Share

‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जवळपास सात दशकांपासून सुरू असलेल्या टाटा  आणि मिस्त्री उद्योग घराण्यांमधील संबंधांना पूर्णविराम देण्याची तयारी गेल्या काही महिन्यांपूर्वीच पूर्णत्वाला गेली होती. जुलै 2018 मध्ये, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल एनसीएलटी, ने यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर दोन महिन्यांनंतर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला. मात्र डिसेंबर 2019 मध्ये, नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलने मिस्त्री यांना टाटा सन्सचे अध्यक्षपद त्यांच्या उर्वरित मुदतीसाठी परत दिले आणि टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले होते.

जानेवारी २०२० मध्ये टाटा सन्सने एनसीएलएटीच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सायरस मिस्त्री यांनी घोषित केले की ते एकत्रित अध्यक्षपदावर परत येणार नाही, परंतु कंपनीच्या बोर्डात त्यांची जागा राखण्यात रस आहे. मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने टाटा सन्सच्या 10 जानेवारी 2020 रोजी झालेल्या अपिलावर सुनावणी करताना एनसीएलएटीच्या निर्णयावर स्थगिती दिली. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रस्तावाबाबत माहिती देताना शापूरजी पालनजी समूहाने, टाटा सन्सपासून विलग होताना टाटा समूहातील उपकंपन्यांचे समभाग पदरात पाडून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेणे करून टाटा सन्समधील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांवरील ताण कमी होईल; तसेच त्यावरील टाटा समूहाचे नियंत्रणही कायम राखले जाईल.

यावर शुक्रवारी २६ मार्च २०२१ ला अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आला यामध्ये सायरस मिस्राी यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल यावर सायरस मिस्राी यांनी मंगळवारी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली. टाटा समूहाविरुद्ध लढताना आपला हेतू स्पष्ट होता आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आपण योग्य दिशेने जात होतो, असे समर्थनही त्यांनी केले. या वादाची तड लावणारा अंतिम निर्णय झाल्याने आता मला निवांत झोप लागेल, अशी भावनाही मिस्त्री यांनी मंगळवारी व्यक्त केली. एक पत्रक जारी करत मिस्त्री यांनी, आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टाटा सन्सचा अल्पसंख्याक भागधारक म्हणून माझ्या खटल्यासंदर्भात दिलेल्या निकालामुळे मी मात्र व्यक्तिश: निराश आहे. मात्र मी यापुढे टाटा समूहाच्या कारभाराच्या दिशेने थेट प्रभाव टाकू शकलो नाही तरी देखील लढ्यादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांचे परिणाम संबंधितांवर होऊन नक्कीच बदल घडून येतील. माझ्या आक्षेपाबाबत अंतिम निर्णय आल्याने आता मला शांत झोप लागेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!