🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अहवाल सादर केला आहे. आयपीएस रश्मी शुक्ला यांनी ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नसल्याची माहिती त्यांनी या अहवालात नमूद केली आहे. या बरोबरच वर्ष २०२० मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-१ च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिस आस्थापना मंडळाच्या सर्व शिफारसी सर्व सदस्यांच्या एकमताने करण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हा अहवाल लीक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्लांसह भाजपवर होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. सीताराम कुंटेंना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखत असून मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री नवाब मलिक यांनीच तो अहवाल तयार करून केवळ कुंटेंना सही करायला लावली असेल, असा आरोप केला आहे
‘मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिका यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफी, म्हणाले…
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- संजय राऊत नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत ते जाहीर करावं; नाना पटोलेंचा टोला
- संजय राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
