Share

कडक लॉकडाऊनला तिलांजली, बंद दुकानातून व्यवहार सुरूच

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात यावा म्हणून सध्या लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारींना नागरिकांकडून कडक लॉकडाऊनची पाळण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र दुकान मालक व प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याने नायगावमध्ये वरुन दुकान बंद, आतून चालू असा प्रकार काही ठिकाणी सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मार्चमध्ये कोरोना बाधीतांची संख्या शंभर पार झाली आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करुनही त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर म्हणावी तशी होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले.विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्याच्या त्याच्या गावात संबंध आहेत. स्थानिक व्यापारी पोलिसांच्या मदतीने वरुन दुकाने बंद, आतून व मागून सुरु असा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. संबंधित विभागांमध्ये समन्वय नसून कर्तव्य पालनात टोलवाटोलवीची भूमिका घेतली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निर्बंधांच्या अंमलबजावणीत संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिक संबंध अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.शहरात ज्या कापड दुकानाला दंड लावण्यात आला, त्याच कापड दुकानदाराने बंदच्या काळात डॉ. हेडगेवार चौकातून कापडाचे गठ्ठेच्या गठ्ठे टेम्पो भरुन आपल्या गावाकडे नेले. नगर पंचायतच्या एका कर्मचाऱ्याने भोंग्यावरून पाठी मागून दुकान चालू आहे म्हणून इतर पथकातील कर्मचाऱ्यांना बोलावले.पण दुकानाच्या मालकाने फोनवर संपर्क साधला तेव्हाच पथकातील एका कर्मचाऱ्याने स्पीकर बंद करून त्यास इतरत्र हलविले.असा प्रकार सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!