Share

धक्कादायक! यु ट्यूबवर ‘तो’ व्हिडिओ पाहून जावयाची सासुरवाडीतच आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायको आणि मुलाला नेण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या तरुणाने यू ट्युबवर आत्महत्येचे व्हिडिओ पाहत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला. ही घटना हिमायतबाग परिसरातील भीमराज नगरात घडली. याविषयी बेगमपुरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सचिन प्रकाश अहिरे (२६, रा. आनंदवाडी, जेतवन कॉलनी कल्याण, जि. ठाणे) असे मृताचे नाव आहे. सचिनची औरंगाबाद शहरातील भीमराज नगरात सासुरवाडी आहे. घरगुती वादानंतर त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी आली होती. यामुळे सचिन तीन-चार दिवसांपूर्वी तो सासुरवाडीत आला होता. तो चार वर्षाच्या मुलाला नेण्यासाठी आल्याचे सांगत होता. त्याची पत्नी आणि सासरची मंडळी मात्र फक्त मुलाला पाठविण्यास नकार देत होते. यावरून त्यांच्यात कुरबुर झाली होती.

दरम्यान, रात्री सर्व जण जेवण करून झोपल्यावर सचिनने छताच्या लाकडाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आज मंगळवारी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला. तेव्हा त्याच्या मोबाइलवर आत्महत्या कशी करावी, याबाबतचा व्हिडिओ त्याने पाहिल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ पाहून सचिनने गळफास घेतल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!