🕒 1 min read
ढाका : बांगलादेश येथील न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतावद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००० मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी नऊ दोषींना आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय सुनावण्यात आला.
कायद्याने जर अडवणूक केली नाही तर फायरिंग पथकाकडून शिक्षेची अंमलबाजवणी केली जाईल. अन्यथा दोषींना फासावार लटकवण्यात येईल असे कोर्टाने सांगितले. बांगलादेश कायद्यांतर्गत मृत्यूदंडांच्या शिक्षेचा आढावा घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनुसार दोषींना फाशी देण्यात येईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
Bangladesh court sentences 14 Islamist militants for attempting to kill Prime Minister Sheikh Hasina in 2000
— Press Trust of India (@PTI_News) March 23, 2021
शिक्षा सुनावण्यात आलेले सर्व दोषी हे हरकत-उल जिहाद बांगलादेश संघटनेचे ऑपरेटिव्ह आहेत. इतर पाच दोषी फरार असून गैरहजेरीत त्यांच्यावरही खटला चालविला गेला. हरकत-उल जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांना २१ जुलै २००० रोजी गोपालगंज येथे ७४ किलो स्फोटकं लपवून ठेवत शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. शेख हसीना यांची प्रचारसभा या ठिकाणी पार पडणार होती. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्यांनी सभेआधीच स्फोटकांची माहिती मिळवली आणि मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्यावर २८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८९ सालीही त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. यातील आरोपींनाही २०१७ साली ११ दोषींना २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलीम अली सरोवरातील मरण पावलेल्या माशांच्या मृत्यूस जबाबदार कोण? चौकशी सुरु
- बेड्सची संख्या वाढवली पण अडवणूकीच्या मानसिकतेचे काय ?
- उतार वयात इतकी बेइज्जती कुणाची होऊ नये; भाजप नेत्याचा घणाघात
- मिरची व्यापाऱ्याने जयंत पाटील यांना फसवले!
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

