🕒 1 min read
मुंबई- भारतात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये एक मोठी घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे.
आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत अस देखील जावडेकरांनी सांगितल.
देशातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी केंद्राने मान्य केली आहे. पंतप्रधान श्री. @narendramodi यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली होती. या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 23, 2021
दरम्यान, हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
- ‘हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले असेल’
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
- आज अखेर जॅग्वारची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

