मुंबई : मराठी संगीत क्षेत्रातील अत्यंत गाजलेले शास्त्रीय गायक महेश काळे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. महेश काळे यांनी स्वत: याबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. मागील काही काळापासून मनोरंजन क्षेत्रीतील कलाकारांना कोरोना संक्रमणाचा धोका वाढतच आहे. काही दिवसापुर्वीच महेश काळे यांनी कोरोना लसही घेतली होती. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वत:ला क्वारन्टाईन करुन घेतल आहे.
महेश काळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे की, ‘अतिशय़ काटेकोर पद्धतीने सर्व नियमानचें पालन करत स्वत:ची अत्यंत काळजी घेऊनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मी काही दिवसापुर्वीच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी कोरोनाचे लसीकरणही केल होतं, तरीही मी स्वत: ला क्वारन्टाईन करुन घेतल आहे. डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत मी क्वारन्टाईनच राहणार आहे. तुमच्या सर्वाच्या प्रार्थनेसाठी मनापासून अभार’ असे ट्विट महेश काळे यांनी केले होते.
सध्या महेश काळे हे ‘सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची’ या गायनाच्या रिअॅलीटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ५ एप्रिल पासून हा शो कलर्स मराठी या वाहीनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलावंताना मागील काही दिवसात कोरोनाची लागण झाली आहे. संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, गौहर खान, सतीश कौशिक, तारक मेहता फेम सुंदरलाल म्हणजे मयुर वकानी तसेच भीडे मास्तरची भूमिका करणारे मंदार चांजवडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट
- रुपालीताईंनी पूजा चव्हाण प्रकरणात पुण्यात राहुनही चकार शब्दही का काढला नाही ?
- कहाणी में ट्विस्ट, जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘कोण होणार करोडपती’च्या यंदाच्या हंगामाचे सचिन खेडेकर करणार सूत्रसंचालन
- परभणी जिल्हा बँकेत वरपुडकर – बोर्डीकर गटामध्ये बँकेत सत्तेसाठी रस्सीखेच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

