Share

परभणी जिल्हा बँकेत वरपुडकर – बोर्डीकर गटामध्ये बँकेत सत्तेसाठी रस्सीखेच

Published On: 

परभणी :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटास २१ पैकी १० व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटास ९ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नेते गणेशराव रोकडे हे छत्री या चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवुन विजयी झाले. दरम्यान पूर्णेतून बालाजी देसाई हे बिनविरोध निवडून आले. देसाई यांनी या वेळी आपण वरपुडकर गटाचेच असल्याचे स्पष्ट केले. परंतू हे दोघे नेमके कोणत्या गटाचे आहे की  स्वतंत्र ? हा संभ्रम अजूनही मिटलेला दिसत नाही.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत सेवासहकारी मतदारसंघातील सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात माजी आमदार बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी, भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे, भगवान सानप हे बोर्डीकर गटाच्या चार, तसेच माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, पंडीतराव चोखट या वरपुडकर गटाच्या दोन जागांचा तर बालाजी देसाई हे एक अशा एकूण सात जागांचा समावेश यामध्ये आहे. त्यामुळे २१  पैकी १४ जागांकरिता निवडणुका झाल्या. त्यात वरपुडकर गटाने 14 पैकी ८ जागा तर बोर्डीकर गटाने ५ जागा जिंकलेल्या आहेत. गणेशराव रोकडे हे छत्री निवडणूक चिन्हावर स्वतंत्रपणे निवडून आलेले आहेत.

कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. देशमुख यांना 43 तर त्यांचे प्रतीस्पर्धी बाळासाहेब निरस यांना २६ मते मिळाली. देशमुख यांनी या वेळी एकतर्फी विजय मिळवला. इतर शेती संस्था मतदारसंघावर रावसाहेब जामकर यांचा मुलगा विजय जामकर यांना पराभव झाला. दरम्यान तेथून भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी विजय मिळवला. तर जामकर 243 तर भरोसेंना 265 मते मिळाली आहेत. तर पाच मते बाद झालेली आढळली आहेत. त्यामुळे आता गणेशराव रोकडे कोणाच्या गटात राहतात या वर पुढील सर्व चित्र अवलंबून आहे. हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!