कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेत ना रामदास आठवले बोलत होते. रामदास आठवले दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर ना.रामदास आठवले पश्चिम बंगाल मध्ये आले आहेत.
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून रिपाइं 15 जागा स्वबळावर लढत असुन उर्वरित 279 जागांवर रिपाइंचा भाजपला पाठिंबा आहे. पश्चिम बंगाल मध्ये दलितांची लोकसंख्या 36 टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस ने बंगाल ला कंगाल केले आहे. मात्र पश्चिम बंगाल ला सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलिततांचा पाठिंबा भाजपला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार विधान निवडणूक लढत असून त्यात जे उमेदवार विजयी होतील त्यांचा भाजपला पाठिंबा राहील अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सोडून आता पर्यंत 64 आमदार बाहेर पडले आहेत. अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे देशात तृणमूल काँग्रेस हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी भाजप ला संधी मिळेल. पश्चिम बंगालचे दलित आणि अल्पसंख्यांक भाजप ला विजयी करतील. पश्चिम बंगाल च्या विकासासाठी रिपाइं आणि भाजप च्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- ‘काका..तुम्ही अनिल देशमुखांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा तुमचं पितळ उघडं पडणारच’
- उतार वयात इतकी बेइज्जती कुणाची होऊ नये; भाजप नेत्याचा घणाघात
- सचिन वाझेसोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये असणारी ‘ती’ महिला कोण ?
- मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, शिवसेनेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

