कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. वडवली पुलाचे औपचारीक लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी या पूलाचे लोकार्पण करून पूल वाहतुकीसाठी सुरू केला. पण काल रात्री हा पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काही दिवसात लोकार्पण होणार आहे, अशी घोषणा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. कोणता तरी स्टंट करुन खोडसाळपणा करण्याचे मनसेचे कामच आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचे काम मनसेने केल्याची टीका भोईर यांनी केली.
वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे सोमवारी लोकार्पण होणार होते. मात्र, अचानक ते रद्द झाले. यानंतर मनसे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांसोबत या पुलावर पोहोचले. त्यांनी या पुलाचे उद्घाटन करुन पूल वाहतूकीसाठी खुला केला. पण रात्रीच्या वेळेत पुन्हा हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. आता मनसेच्या या लोकार्पण कार्यक्रमावर शिवसेनेने निशाण साधला.
वडवली पुलाचे लोकार्पण काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले. त्याची माहिती सर्व आमदारांना दिली होती. असे असताना मनसेने राजकीय स्टंटबाजी करीत खोडसाळपणा केला आहे शिवसेनेने या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून हा विषय मार्गी लावला होता. त्यामुळे या पुलाचा मार्ग मोकळा झाला होता.
पण या कामांचे श्रेय घेण्याचे काम मनसेने केले आहे. त्याचाच प्रत्यय वडवली पूलाच्या अनधिकृत लोकार्पण करण्याच्या कृतीतून समोर आला आहे. पुलाचे अनधिकृत लोकार्पण असल्याने आता पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. लवकरच या पुलाचे अधिकृत लोकार्पण होईल अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
- ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती
- परभणी जिल्हा बँकेत वरपुडकर गटाचे वर्चस्व
- ‘कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा’
- ‘कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा’


