धुळे : राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना अटकावासाठी शासनाकडून सांगण्यात आलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वांनीच आवाहन करूनही काही नेते मंडळी कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं समोर येत आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर, नियम न पाळणाऱ्या सामन्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मग, नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना सूट आहे का ? असं एका लग्न समारंभावरून समोर येत आहे. धुळे महापालिकेतील भाजप नगरसेविका सुरेखा उगले आणि पालिका अभियंता चंद्रकांत उगले यांच्या कन्येचा विवाह धुमधडाक्यात पार पडला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करत आहे. तर दुसरीकडे उपायोजना व जनजागृती करत असल्याचा डंका वाजवणारे मनपा प्रशासनातील कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले यांनीच कोरोना नियमन हरताळ फासून आपल्या मुलीचा विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. दरम्यान, यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात नियमाचे पालन न केल्याने मनपा कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, नगरसेविका सुरेखा उगले यांच्यासह मुलगा गौरव उगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एवढच नाही तर, पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले असताना देखील उगले यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी सर्रासपणे डीजेचा वापर करण्यात आला. तर, विवाह मंडपाला देखील उगलेंनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रुपालीताईंनी पूजा चव्हाण प्रकरणात पुण्यात राहुनही चकार शब्दही का काढला नाही ?
- महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट
- कहाणी में ट्विस्ट, जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची; राष्ट्रवादीचा आरोप
- थकीत कर्जदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; लोन मोरॅटोरिम प्रकरणात अंतिम निकाल जाहीर
- कंगनाच्या वाढदिवसाला संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’च्या टीमने दिले खास गिफ्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

