मुंबई : ‘कोण होणार करोडपती’ हा सोनी मराठीवरील रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रिअॅलिटी शोचे लवकरच दुसरे पर्व येणार असून, या शोच्या दुसऱ्या पर्वाचा लोगो नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शक व सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांनी केले होते.
सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं मागील वर्षाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते. परंतु यावेळी ते सूत्रसंचालन करणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
मात्र आता या वर्षीचे ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार असल्याचे समजत आहे. सचिन खेडेकर यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात उल्लेखनीय असे काम केले आहे. सचिन खेडेकर हे त्यांच्या आवाजामुले तसेच त्यांच्या अभिनयामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. त्यांच्यात असलेल्या त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतील यात शंका नाही.
या कार्यक्रमात एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आता करता येणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल पर्यंत ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक नोंदणी करू शकतात. त्यामुळे स्पर्धकांना आता पुन्हा एकदा आपल्या ज्ञानाच्या जोरावर हा खेळ खेळता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलीम अली सरोवरातील मरण पावलेल्या माशांच्या मृत्यूस जबाबदार कोण? चौकशी सुरु
- उतार वयात इतकी बेइज्जती कुणाची होऊ नये; भाजप नेत्याचा घणाघात
- मिरची व्यापाऱ्याने जयंत पाटील यांना फसवले!
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
- ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती


