Share

कहाणी में ट्विस्ट, जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची; राष्ट्रवादीचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, सचिन वाझेंना एनआयएने अटक केली असून २५ मार्च पर्यंत त्यांना एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत एनआयएने पाच गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.

दुसरीकडं, आता महाराष्ट्र एटीएस देखील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात निष्कर्षाच्या जवळ पोहोचली आहे. तर, एटीएसने व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त केली आली आहे. ही गाडी सचिन वाझे याच्या बिझनेस पार्टनरची असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एका फेसबुक पोस्टद्वारे ही गाडी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची फेसबुक पोस्ट –

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट

महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर.

मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.

https://www.facebook.com/NCPSpeaks/posts/2004810832990070

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!