Share

‘कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस करणार आहेत. याबबातची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

‘पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडं त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले आहेत. ‘तत्कालीन गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला काम पाहत होत्या असे कळते. कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा आहे’. असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!