🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली आहे. यामुळे अनेक नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सत्र सद्या सुरु आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘कोरोना झाल्यामुळे ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत ते रुग्णालयात होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते २७ फेब्रुवारी पर्यंत घरीच विलगीकरणात होते, त्यामुळे सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची भेट झालीच नाही,’ असा दावा पवारांनी केला होता.
काका..तुम्ही @AnilDeshmukhNCP यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा तुमचं पितळ उघडं पडणारच आहे. भ्रष्ट गृहमंत्र्यांना पाठीशी घालताना आपण पत्रकार परिषदेतसुद्धा किती खोटं बोलत आहोत, याच भान असावं. @PawarSpeaks प्रमाणाबाहेर जरी खोटं रेटलं तरी सत्य जनतेसमोर येणारच.#ResignAnilDeshmukh pic.twitter.com/JqlQd6Bfpt
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
पवारांच्या या दाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच खोडून काढलं होतं. तसेच, इतर भाजप नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं होतं. आता, भाजपने पुन्हा एकदा शरद पवारांवर घणाघात केला आहे. ‘काका..तुम्ही अनिल देशमुखांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा तुमचं पितळ उघडं पडणारच आहे. भ्रष्ट गृहमंत्र्यांना पाठीशी घालताना आपण पत्रकार परिषदेतसुद्धा किती खोटं बोलत आहोत, याच भान असावं. पवार तुम्ही प्रमाणाबाहेर जरी खोटं रेटलं तरी सत्य जनतेसमोर येणारच.’ असं टीकास्त्र भाजपने सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सावंत साहेब…आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या अंमलाखाली राहतो आहे ?
- ‘…म्हणून उद्धव ठाकरे अनिल देशमुख यांना वाचवत आहेत’
- सचिन वाझेसोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये असणारी ‘ती’ महिला कोण ?
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

