🕒 1 min read
मुंबई : सध्या भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांवर चित्रपट बनवले जात आहेत. यामध्ये क्रीडा विश्वातील धोनी, मिल्खासिंग, तसेच येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे.
हा चित्रपट प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. तर राजकारणातील नेत्यांवर देखील अनेक सिनेमे आले आहेत यामध्ये आता तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीतबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘थलायवी’ असं आहे.
आज 23 मार्च रोजी कंगनाच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा अर्थात ‘थलायावी’चा ट्रेलर लाँच झाला आहे. हा दिवस खास आहे. कारण 23 मार्च हा कंगना रनौतचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवस सर्वात अविस्मरणीय ठरणार आहे. कंगनाचा हा खास दिवस संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’ची टीम कसलीही कसर सोडली नाहीये. चित्रपटाच्या प्रमोशनची प्रत्येक शैली स्वत:मध्येच खास असणार आहे.
#ThalaiviTrailer @vishinduri @thearvindswami @ShaaileshRSingh @BrindaPrasad1 @neeta_lulla #HiteshThakkar #RajatArora @ZeeStudios_ #GothicEntertainment @Thalaivithefilm Official Trailer (Hindi) | Kangana Ranaut | Arvind Swamy | Vi… https://t.co/c5ZRyU5ZJp via @YouTube
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021
हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन झाले’, कॉंग्रेस नेत्यानी उडवली खिल्ली
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
- आज अखेर जॅग्वारची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल
- पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

