Share

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकल्या त्या केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. नुकत्याच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या आल्या होत्या. तर आता पुन्हा सरकारी बँका मार्चचा अंतिम आणि एप्रिलच्या पहिल्या आवठ्यांत आठ दिवस बंद राहणार आहेत. २७ मार्चपासून ते ३१ मार्च तसेच १, २ एप्रिल आणि ४ एप्रिलला बँका विविध कारणांसाठी बंद राहतील.

आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांसाठी मार्च महिना महत्वाचा असतो. पण मार्चअखेरीस होळी, शनिवार, रविवार आणि बँकांच्या वर्षाचा आर्थिक हिशेब करण्यास बँका बंद राहणार आहेत. चालू महिन्यातील बँकांच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन नागरिकांना २६ मार्चआधी उरकावे लागणार आहे.

यामध्ये २७ मार्चला दुसरा शनिवार, २८ मार्चला रविवार, २९ मार्चला धूलिवंदन सण, ३० मार्चला मार्च अखेरचा दिवस तर ३१ मार्चला सार्वजनिक व्यवहार बंद असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर १ एप्रिलला अकाउंट क्लोजिंगचा दिवस, २ एप्रिल दिवशी गुड फ्रायड तर ४ एप्रिलला रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज राहणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये बँक सुरु असतानीही ग्राहकांची बँकेची महत्त्वाची कामे शिल्लक राहिल्यास ती करण्यासाठी ५ एप्रिलची वाट पहावी लागणार आहे.

नुकतच १५ ते १६ सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी बँकांच्या खाजगीकरणविरुद्ध पुकारलेल्या संप आणि सुट्ट्यांमुळे बांका सलग चार दिवस बंद असल्याने ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आता सलग सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज पुन्हा ठप्प होणार आहेत. आधीच कोरोना निर्बंधांमुळे बँकांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!