Share

वीज पुरवठा खंडीत करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : मागील वर्षभर राज्यातील नागरिकांनी लॉकडाऊन अनुभवले, या काळात नागरिक घरी राहिल्यामुळे त्यांचा वीजबिलात वाढ झाली. या वाढीव वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेकांचे वीजबिल थकीत राहिले. ही थकीत बिल वसूल करण्यासाठी महावितरण सरसावली आहे. जिल्हा दुसऱ्या लॉकडाउनच्या उंबरठ्यावर असताना. महावितरण नागरिकांची वीज खंडित करण्याचे काम करीत आहे.

अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. रवी ताराचंद थोटे हे महावितरणमध्ये साहाय्यक अभियंता आहेत. ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन २१ मार्च रोजी मुखेडच्या हेडगेवार चौकात गेले होते. या ठिकाणी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा त्यांनी तोडला. त्याचा राग मनात धरून ग्राहकाने थोटे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे किरकोळ कारणावरून एका ट्रॅक्टर चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मार्च रोजी घडली. सुनील बाबूराव गायकवाड हे चिकनच्या दुकानासमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आला. दिवसभर कुठे गेला होता, असे म्हणून त्याने गायकवाड यांच्याशी वाद घालून मारहाण केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!