🕒 1 min read
पुणे : भारतीय संघाविरुद्धची टी-२० मालिके इंग्लंडच्या संघाचा ३-२ अशा फरकाने पराभव झाला. मात्र या मालिकेत पराभव स्विकारावा लागुनही इंग्लंडच्या संघाला फायदाच झाला आहे, असे कर्णधार मॉर्गनने म्हणले आहे. टी-२० सामन्याचे आयोजन हे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर करण्यात आले होते. याच मैदानावर आगामी टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या मैदानावर विश्वचषकाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले त्याच मैदानावर सामने खेळण्याचा अनुभव मिळाल्याचा इंग्लंडच्या संघाला निश्चीतच फायदा होईल अशे कर्णधार मॉर्गनने म्हणले आहे. भारतात यंदाच्या वर्षआखेरीस आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून भारताविरुद्धची टी-२० मालिका नक्कीच फायदेशीर ठरेल असे इंग्लंडचा कर्णधाराने सांगितले.
तसेच भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलमध्ये सहभाग घेऊन पुर्वतयारी करण्याच्या संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्या असा सल्लाही कर्णधार मॉर्गनने दिला आहे. आयपीएलला येत्या ९ एप्रिल पासुन सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचे खेळाडू विविध संघाद्वारे खेळतात. या स्पर्धेदरम्यान विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणून भारतातील खेळपट्ट्या, वातावरण यांचा पुरेपुर अभ्यास करा असा सल्ला कर्णधार मॉर्गनने सहकाऱ्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे
- ए भाई , तू जो कोण असशील… माझ्यावर बोट उचलायचं न्हाय – अमृता फडणवीस
- “रोहित शर्माचा नाद नाही करायचा तो टी-२० मध्ये सुद्धा द्विशतक ठोकू शकतो”
- ‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
- भारतीय संघासाठी वाईट बातमी?…कर्णधार कोहली होऊ शकतो संघाबाहेर


