🕒 1 min read
अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली आहे. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची लय बिघडवून टाकण्यासाठी धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या साथीने आक्रमक भारतीय कर्णधार विराट कोहली सलामीला उतरण्याची योजना आखत आहे.
मागील काही वर्षापासून क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हे नाव खूप चर्चेत आलं. याचे कारण म्हणजे सलामीवीर म्हणून केलेली कामगिरी आणि मुख्यतः रोहित शर्मा जगामधील केवळ एक असाच फलंदाज असेल की ज्याच्या शतकापेक्षा द्विशतकाची वाट जास्त बघितली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत तीन द्विशतके ठोकली आहेत.
आता चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर खेळाडू ड्वेन ब्रावो याने रोहित शर्मा बद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना ड्रेन ब्रावो म्हणाला की t20 मध्ये जर कोणी द्विशतक करू शकेल तर तो रोहित शर्मा आहे. मुलाखतीमध्ये ड्वेन ब्रावो ला प्रश्न विचारला होता की t20 मध्ये शतक करणारा कोण खेळाडू असेल तर त्यावर त्यांनी लगेच रोहित शर्मा असे उत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाद्वारे सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती
- ‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
- मोठी बातमी : पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल
- विनामास्क फिरणार्या नागरिकांना प्रशासन करणार क्वॉरंटाईन
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे


