🕒 1 min read
मुंबई : १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन संपवले होते. त्याच्या अचानक जाण्याने चाहता वर्गाला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या जीवन संपवण्यामागे काही बड्या लोकांचा हात असल्याचे आरोप केले गेले होते. यावरून अनेक महिने राजकारण तापले होते. सुशांत आणि क्रिती सॅनॉन हे दोघे खूप चांगले मित्र होते. मात्र, सुशांतच्या आत्महत्येनंतर क्रितीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांना क्रितीवर बरीच टिका देखील केली होती. आता एवढ्या दिवसांनंतर यावर क्रितीने खुलासा केला आहे. क्रिती म्हणाली की, त्यावेळी सर्वच ठिकाणी एवढा गोंधळ सुरू होता. सर्वजणच त्यावर काही ना काही बोलत होते. एक वेळ अशीही आली की, या सर्वात मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता दिसू लागली होती आणि मला नकारात्मकतेत सहभागी व्हायचं नव्हतं.
त्यावेळी मला काय जाणवत होते किंवा किती दुःख झालं होतं हे केवळ मलाच माहीती होतं आणि मला ते स्वतःपूरतच ठेवयचं होतं. मला काय वाटतंय किंवा काय जाणवतं आहे.हे मी कोणाला सांगावं असं मला त्यावेळी वाटलं नाही. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला सोशल मीडियावर जे बोलायचं ते तुम्ही बोलू शकता.
दरम्यान, बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. क्रितीसोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांना ही बातमी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- आयपीएलआधी खेळाडूंना कोरोना लस द्या ; ‘या’ संघाची बीसीसीआयकडे मागणी
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

