🕒 1 min read
अहमदाबाद : “सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे टॉप क्लास खेळाडू आहेत. मी सूर्यकुमारसोबत खूप वेळ घालवला आहे. तो अफलातून आहे. तसेच मी इशानला 2019 च्या आयपीएलमध्ये नेट्समध्ये सराव करताना पाहिलं होतं. तो स्विंग विरोधात खेळण्याचा प्रयत्न करतो. तो यात आता पारंगत झाला आहे. मी हे पाहून प्रभावित झालो आहे, असं म्हणत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सूर्या आणि इशान किशनचं कौतुक केलं आहे.
सूर्यकुमार आणि इशानने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात इशानने चमकदार कामगिरी केली. आपल्या पदार्पणात त्याने अर्धशतक झळकावलं. इशान डेब्यु मॅचमध्ये अशी कामगिरी करणारा अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. मात्र या सामन्यात सूर्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चौथ्या सामन्यात सूर्याला संधी मिळाली.
दरम्यान, भारताने शनिवारी इंग्लंडविरुद्ध ५ वा टी२० सामना ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेली टी२० मालिकाही ३-२ अशा फरकाने जिंकली. या सामन्यापूर्वी मालिकेत २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे ५ वा सामना निर्णायक होता. या निर्णायक सामन्यात विजय मिळवत भारताने सलग ६ वा टी२० मालिका विजय मिळवला आहे. या विजयानंतर मालिका विजयाची ट्रॉफी कर्णधार कोहलीने संघातील नवोदित खेळाडू सुर्यकुमार आणि इशान किशनकडे सोपवली.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- आयपीएलआधी खेळाडूंना कोरोना लस द्या ; ‘या’ संघाची बीसीसीआयकडे मागणी
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा’


