Share

आज दिल्लीत अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांसह तातडीची बैठक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.

राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांना तातडीने दिल्लीत बोलावलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत या तिघांमध्ये बैठक होईल. अजित पवार आणि जयंत पाटील हे पंढरपूरमध्ये आहेत. भारत भालके यांच्या निधाननंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार निश्चितीसाठी ते पंढरपुरात आहेत. मात्र, दुपारनंतर ते दिल्लीत पवारांना भेटण्यासाठी जातील.

अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, शरद पवारांनी अजित पवार, जयंत पाटील यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावल्यानं तर्क-वितर्क काढले जात आहेत. दिल्लीतील बैठकीत काय होतंय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख यांच्या भवितव्यावर या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!