🕒 1 min read
मुंबई : मराठी सुपरस्टार भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नाटक आसो वा चित्रपट प्रत्येक ठिकाणी त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटसृष्टितील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. मिळालेली प्रत्येक भूमिका प्रभाविपणे सादर करण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे.
भरत जाधव यांनी नुकताच आपल्या सोशल मीडीयावर सही रे सही या नाटकातील गलगले या पात्राविषयी एक किस्सा आपल्ये चाहत्यांसोबत शेअर केला. याबद्दल त्यांनी इन्साग्रामवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये ते म्हणतात ‘१९९४ ची गोष्ट आहे. पुण्यात बालगंधर्व नाट्य़गृहात प्रयोग होता. यादरम्यान बालगंधर्वच्या समोर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा घेत होतो तेव्हा एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला दिसले’
https://www.instagram.com/p/CMjv7I3BI-U/
‘रस्ता ओलांडणारी ती व्यक्ती स्वत:शीच संवाद साधत होती. ‘डावीकडे पाहा, आता उजविकडे पाहा… चला आता रस्ता ओलांडूया’ असा सवांद त्याव्यक्तीचा स्वत:शीच सुरु होता. या पाच-सहा वाक्यात मला गलगले सापडले. या पात्राला घेऊन माझ्या मनात शंका होती. मात्र २००२ मध्ये ‘सही रे सही’मध्ये गलगले ही व्यक्तीरेखा चपलख बसली आणि लोकांनी तिला भरपुर प्रेम दिले. पुढे जाऊन याच व्यक्तीरेखेवर आधारीत ‘गलगले निघाले’ हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला.
महत्वाच्या बातम्या
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
- पंधरा केंद्रांवर तीन हजार 912 परीक्षार्थी एमपीएससीची परीक्षा देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

