मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर भाजप नेते नारायण राणे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ‘परमबीर सिंग हे पोलीस अधिकार आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात वाझे यांना वाचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
परमबीर सिंग यांनी वसुलीची माहिती ठाकरे यांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर कारवाई का केली नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री ठाकरे यांचासुद्धा १०० कोटी वसुली प्रकरणात संबंध आहे. एक तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना, देशमुखांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे
- भाजप जगातला सर्वात लुटारू पक्ष ; ममता बॅनर्जींचा घणाघात
- ‘पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती, महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली’
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, दरेकरांची मागणी
- ‘यांचे पुढील बाप कोण याची देखील माहिती दयावी’, भाजप नेत्याची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

