परभणी : राज्य सेवा (पूर्व) परिक्षा 2020 रविवारी रोजी परभणीतील 15 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशाप्रमाणे 15 उपकेंद्र अधिगृहीत केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली आहे.
जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या केंद्रावर 336, (कै) रावसाहेब जामकर माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाच्या केंद्र 336, (कै.) सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय 169, शारदा महाविद्यालयाच्या केंद्रावर 240, शारदा विद्यालयाच्या (माध्यमिक) 240, वसमत रस्त्यावरील संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर 240, श्री शिवाजी इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजच्या केंद्रावर 240, श्री सारंग विद्यालय 288, (कै.) मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर श्रीहरी नगर केंद्रावर 240, शिवाजी महाविद्यालय केंद्रावर 240, श्री शिवाजी पॉलिटेक्नीक इंस्टिट्यूट केंद्रावर 240, नानलपेठमधील बालविद्या मंदिर हायस्कूलच्या केंद्रावर 336, स्टेशनरोडवरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत 288, शिवाजीनगरातील मराठवाडा हायस्कूलच्या केंद्रावर 240 व सुपर मार्केटजवळील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्चमाध्यमीक विद्यालयाच्या केंद्रावर 240 असे एकूण तीन हजार 912 परिक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
त्यासाठी या पंधरा केद्रावरील 163 खोल्या, 15 उपकेंद्र प्रमुख 62 पर्यवेक्षक, 178 समवेक्षक, 18 सहाय्यक कर्मचारी व 30 शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली. परिक्षार्थींनी परिक्षेच्या अगोदर अर्धा तास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

