Share

रिलेशनशिपबद्दल कियारा अडवाणीचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या प्रेमसंबधाविषयी अनेक चर्चा सुरु असतात. मागील काही दिवसापांसून कियाराचे नाव हे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु आहे. दोघांनीही मात्र हे नात अद्याप स्विकारलेले नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने स्वत:च्या रिलेशनशिपबद्दल खुप मोठे वक्तव्य केले आहे.

शाहिद कपूर सोबतच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या यशानंतर कियाराचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाऊ लागले. दरम्यान मागच्या काही काळापासून कियारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना अनेकदा एकत्र बघण्यात आले आहे. मात्र हे दोघंही नेहमीच आपण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगताना दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीती कियारानं रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडत सिद्धार्थचे नाव न घेता ‘मी एका अभिनेत्याला डेट करत आहे’ असं सांगितलं.

नुकतीच फिल्मफेअर मासिकाच्या मुखपृष्ठावर कियारा अडवाणी झळकली. यावेळी कियाराला दिलेल्या मुलाखतीत ‘तू शेवटचं कोणाला डेट केलं होतंस?’ या प्रश्नावर देताना कियारा म्हणाली, ‘मागच्या वर्षी ज्या व्यक्तीला डेट केलं होतं त्यालाच मी सध्या डेट करत आहे आणि यावर्षीही आम्ही दोन वेळा डेटवर गेलो होतो. मागील काही दिवसात कियारा अनेकदा सिद्धार्थच्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसली होती. सिद्धार्थ आणि कियारा यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट २ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!