🕒 1 min read
पुणे : राज्यात सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची योजना गेली कित्येक वर्षे सुरु आहे. अनेकदा ही योजना कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेली दिसून आलं आहे. कधी या भोजनात किडे, तर कधी पाल, झुरळ देखील सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे महापालिकेच्या एका शाळेत गाय,बैल अशा जनावरांना दिलं जाणार पशुखाद्य विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी पुरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समोर येताच चौकशीचे आदेश दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला ५८ नंबर शाळेसाठी मध्यान्ह भोजनासाठी लागणाऱ्या धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
जेव्हा शाळेतील अधिकारी धान्य उतरवत होते, तेव्हा त्यांना हे पशुखाद्य असल्याचं लक्षात आलं. स्थानिक कार्यकर्त्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतल्याने भारतीय खाद्य आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ही चूक शाळेतील अधिकाऱ्यांना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ही योजना राज्य सरकारच्या अखत्यारित येते – महापौर मुरलीधर मोहोळ
Maharashtra: A Govt school in Pune received cattle fodder, instead of mid-day meal for students.
Pune Mayor says, "Mid-day meal scheme is run by state govt. Municipal corporation is responsible for only distribution among students. It's very unfortunate. An inquiry is demanded." pic.twitter.com/9cO1wcfefQ
— ANI (@ANI) March 19, 2021
या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यांनी भाष्य केलं आहे. ‘हे महाराष्ट्र सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. केवळ, हे भोजन विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यास केवळ पुणे महापालिका जबाबदार आहे. विद्यार्थ्यांसाठी जनावरांचं खाद्य पुरवणं हे दुर्भाग्य आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील ‘कुंभकर्ण सरकार’ला कधी जाग येणार ? जागतिक निद्रा दिनी जयंत पाटलांची खोचक टीका !
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

