Share

‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध शिवसेना आमदार व माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडले गेल्यानंतर या प्रकरणात भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली होती.

काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही किल्प्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडीवरील दबाव वाढला होता. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिक अडचण वाढणार असल्याचे दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता.

तर सध्या, मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर भाजपने मात्र महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. या प्रकरणामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली असताना पूजा चव्हाणचं प्रकरण मागे पडलंय का ? असा सवाल केला जात आहे.

दरम्यान, पूजा चव्हाणला न्याय मिळवून देणारच, हे प्रकरण मागे पडू देणार नाही अशी ग्वाही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यात भाजप नेते कोणतीही कसूर सोडत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ… पूजा चव्हाणला न्याय मिळायलाच पाहिजे.’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!