🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे.
दरम्यान, मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर भाजपने मात्र महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
‘कोण कोणास म्हणाले – व्यवहार माझे, जबाबदार वाझे! सांगा पाहू …’ असं खोचक ट्विट अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं असून परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांचे गॉडफादर असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. तर, उद्धव ठाकरेंचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझेंशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यामुळे, या ट्विटमधून त्यांचा रोख हा उद्धव ठाकरेंकडे असल्याचं बोललं जातंय.
कोण कोणास म्हणाले –
*व्यवहार माझे,*
*जबाबदार वाझे!*
सांगा पाहू …….— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 19, 2021
काही चेल्यांकडून उद्योगपतींना घाबरवून वसुली करण्याची योजना – अमृता फडणवीस
दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. ट्विट करून त्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘एकीकडे नागपूरसारख्या शहरांना कोरोना रूग्ण भरती करण्यासही जागा मिळत नाहीये, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यांच्याच काही चेल्यांकडून उद्योगपतींना घाबरवून वसुली करण्याची योजना केली जात आहे.,’ अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील ‘कुंभकर्ण सरकार’ला कधी जाग येणार ? जागतिक निद्रा दिनी जयंत पाटलांची खोचक टीका !
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; आता आठवलेही पाठवणार शाहांना पत्र
- पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली ? सूर्यकुमारनं सांगितलं गुपित !
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- पुणे जिल्हा परिषदेने पिकोफॉल-शिलाई मशीन खरेदीसाठी काढलेल्या निविदेच्या लिलावात गैरव्यवहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
