Share

मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेअनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आली आहे.

तर,गुरुवारी दिवसभरात राज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा २५ हजारांपार गेल्याने चिंतेत मोठी भर पडली आहे. राजधानी मुंबईत देखील कोरोनाचा विळखा पुन्हा वाढत आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार आहेत. याबाबत आता आजपासूनच हे निर्बंध लागू होण्याची शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.

‘मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ही चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारच्या आधीच नवीन नियम लागू करावे लागणार आहेत. बाजार, मॉल आणि पब पाठोपाठ समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे, तिथेही नियम कडक करावे लागणार आहेत. लोक रात्रभर समुद्र किनारी गर्दी करत आहेत. याच कारणांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होत आहे. त्यामुळे, आज संध्याकाळपर्यंत नवीन नियम लागू करण्याबाबत निर्णय होईल,’ असं भाष्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. यामुळे मुंबईत कोणते निर्बंध लागू केले जाणार याकडे सामान्यवर्गाचं लक्ष्य आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!