Share

‘आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, तो अभुतपूर्व आहे’ बुमराह पाठोपाठ संजनानेही मानले आभार !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे. बुमराहची होणारी भावी बायको कोण आहे? याबाबत सुरुवातीला दोन नावांची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हिच्याशी लगीनगाठ बांधली आहे.

सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, नुकतेच बुमराह याने आपल्या इंस्टाग्राम वरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून यावर शिक्कामोर्तब केल.

दरम्यान आता बुमराहने लग्नानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह आणि स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत लग्न झालं. 15 मार्चला गोव्यामध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले. या नव्या जोडप्यावर सध्या जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व शुभेच्छांचा बुमराह आणि संजनां स्वीकार केला असून सर्वांचे आभार मानले आहेत. ‘गेले काही दिवस हे जादुई होते. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहेत, धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया बुमराहनं दिली आहे.

त्यानंतर बुमराह पाठोपाठ संजना गणेशननं देखील ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. ‘गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, तो अभुतपूर्व आहे. आम्ही तुमच्या सर्वाचे मेसेज आणि शुभेच्छा आम्ही वाचत असून त्या खूप आनंद देणाऱ्या आहेत. धन्यवाद,’ या शब्दात संजनानं सर्वांचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!