🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पुणे येथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी झाली. चौथ्या टी-२० सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा सुर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद हे विराट कोहलीकडे देण्यात आले तर रोहित शर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही मालिका येत्या २३ मार्चपासून पुणे येथे खेळवण्यात येणार आहे.
खराब कामगीरीमुळे संघाबाहेर झालेल्या पृथ्वी शॉसाठी संघाचे दरवाजे अजुनही बंदच आहेत. पृथ्वी शॉने विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांची बरसात केली होती. मात्र आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून चमकदार कामगिरी करणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे. या मालिकेद्वारे कृणाल पांड्याचे एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण होत आहे. कृणाल पांड्या हा २०१८ पासून टी-२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करतो. बीसीसीआयने टि्वट करत याबाबत माहिती दिली आहे.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.
— BCCI (@BCCI) March 19, 2021
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –
२३ मार्च – पहिला सामना
२६ मार्च – दुसरा सामना
२८ मार्च – तिसरा सामना (सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार)
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- वाझे प्रकरण हे सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड, याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का? – कॉंग्रेस
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
- #RippedJeans ट्रेंड वरील ट्वीट वरून कंगना झाली ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
