Share

वाझे प्रकरण हे सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड, याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का? – कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. सचिन वाझे यांचा एनआयएकडून तपास केला जात असून यात अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत.

एनआयएने वाझे यांना आता अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी वाझे यांचे त्यावेळी जोरदार समर्थन केले होते यात सर्वात पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडीवर होते. त्यामुळे विरोधीपक्षांनी वाझे यांची पाठराखण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि विशेषतः शिवसेना नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली जात आहे.

दरम्यान, विरोधक शिवसेनेला या मुद्द्यावरून झोडपून काढत असताना आता कॉंग्रेसने देखील शिवसेनेला खिंडीत पकडले आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी एक ट्वीट केले असून यात ते म्हणतात,“शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचं सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

दरम्यान,भाजपनेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर याच मुद्द्यावरून तोफ डागली आहे. ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!