🕒 1 min read
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने 5 गाड्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने तपास करत असताना सचिन वाझें यांच्या ताब्यात असलेली मर्सिडीज कार ही जेजे स्कूल ऑफ आर्टच्या बाहेरील पार्किंग लॉट मधून जप्त केलेली आहे. आतापर्यंत 5 वाहने जप्त केली असून यामध्ये स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, मुंबई पोलिसांच्या पथकाची इनोवा कारसह दोन मर्सिडीज गाडी व एक प्राडो गाडी जप्त केली आहे.
दरम्यान,सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक विजयकुमार भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग प्रमुख आहेत.
याच गाडीतून स्वतः सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना घेऊन सीपी ऑफिसला आले होते अशी माहिती समोर येत आहे.मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासादरम्यान MH 02 CC 0101 क्रमांकाची प्रॅडो गाडी जप्त करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?
- कोरोना वाढला ; जम्बो कोविड केअर सेंटर होणार पुन्हा सुरू
- ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस द्यावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
- सान्या मल्होत्राच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
