Share

दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार विद्यार्थ्यांनी तयारी करावी…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे, यावर आळा घालण्यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील केले जात आहे. मात्र सद्य परिस्थितीमध्ये कोरोना वाढत असला तरी दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेताना सुरक्षेचे उपाय म्हणून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत जारी करण्यात येणार असल्याचे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही शिक्षण मंडळाने केले आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे रोजी होणार असून, बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शिक्षण मंडळाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दिली जातील तसेच शाळांनाही सूचना दिल्या जातील. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची नियमित तयारी विद्यार्थ्यांनी करावी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!