अहमदाबाद : आयपीएलमध्ये मुंबई इंडीयन्स कडून चांगले प्रदर्शन करुनही भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सुर्यकुमार यादव नाराज झाला होता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सुर्यकुमारला निवड समितीने संघात समाविष्ट केले. मात्र पदार्पनाच्या सामन्यात फलंदाजी न मिळाल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. तर पुढच्याच सामन्यात त्याला संघाबाहेर बसवल्यामुळे निवड समितीवर अनेक माजी क्रिकेटपटुंनी कर्णधार कोहलीवर टिका केली होती.
मात्र चौथ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाले आणि विषेश म्हणजे कर्णधार कोहलीने त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. सुर्यकुमार फंलदाजीला आला तेव्हा समोर फॉर्म हरपलेला राहुल खेळत होता. गोलदांजी करत होता जोफ्रा आर्चर. समोरुन येणाऱ्या आर्चरने टाकलेला पहिलाच चेंडु थर्ड मॅनला फटकावुन षटकाराने सुर्यकुमारने आपल्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली.
https://twitter.com/cric_neaz/status/1372549646799663109
यानंतर त्याने दबावाला झुगारत आपली नैसर्गीक खेळी सुरुच ठेवली चौकार मारत त्याने आपल्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या २८ चेंडुत झळकावले आणि तेही संघातील प्रमुख फलंदाज रोहित, के.एल. राहुल आणि कर्णधार कोहली माघारी परतले आसताना त्याची ही खेळी खरच खास होती. सामनावीराच्या पुरस्काराने त्याला गौरवीण्यात आले. मात्र आतापर्यंत मालिकेत झालेली संघनिवड पाहता सुर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात खेळेल का आणि खेळला तर कोणत्या स्थानावर हा प्रश्नच आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही’
- निर्णायक लढतीत भारताचा विजय; मालिकेतील आव्हान कायम
- औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आढळले १५५७ कोरोनाबाधीत
- मराठी आभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापटला यांना कोरोनाची लागण
- एमबीए आणि तेही क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलीया क्रिकेटने सादर केली संकल्पना


