🕒 1 min read
मुंबई : पुढील महिन्यात ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. नुकतेच या सत्रातील सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तसेच काही दिवसापुर्वी आयपीएलने यंदाच्या सत्राचे प्रोमोही प्रदर्शित केलेले आहे. या प्रोमोमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आभिनय केला आहे.
या दरम्यान आयपीएल मधील हैदराबाद सनरायझर्स या संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या संघाचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलीयात सुरु असलेल्या मार्श करंडकात खेळताना शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहे. ग्रोइन दुखापतीनंतर वॉर्नर या स्पर्धेत न्यू साउथ वेल्स या संघाकडून खेळत आहे. वॉर्नरने तस्मानियाविरुद्ध ११५ चेंडूत १०८ धावांची खेळी केली आणि न्यू साउथ वेल्सला विजय मिळून दिला.
Century kaburu challaga cheptunnam.. Mana Warner Mawa kathalo maro century ????@davidwarner31 #MarshCup #OrangeArmy #KeepRising
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 18, 2021
हैदराबाद सनरायझर्सने डेव्हिड वॉर्नरचा या सामन्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आयपीएलसाठी हैदराबादचा संघ तयार असल्याचे सुचवले आहे. वॉर्नर गेल्या काही महिन्यापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र आता तो फिट झाला असून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करू शकतो. हैदराबाद संघाचा तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. २०२० च्या आयपीएलमध्ये डेव्हिडने ५४८ धावा केल्या होत्या. त्यात ४ अर्धशतक होती.
महत्वाच्या बातम्या
- UPAचे अध्यक्षपद पवारांकडे देवून काँग्रेस नेत्यांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला हवे – संजय राऊत
- ‘परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता’
- ‘दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना तपासासाठी ‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे?’
- षटकाराने सुरुवात करत सुर्यकुमारने साकारली अर्धशतकी खेळी; सामनावीराचा मानकरी
- त्या जिलेटिन कांडय़ांचे स्फोट झाले नाही पण राजकारण आणि प्रशासनात मात्र त्या कांडय़ा स्फोट घडवीत आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
