Share

UPAचे अध्यक्षपद पवारांकडे देवून काँग्रेस नेत्यांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला हवे – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कॉंग्रेसचे चांगलेच खच्चीकरण करताना दिसून येत आहेत. राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA बाबत मोठं वक्तव्य केलं असून सोनिया गांधी यांना अध्यक्षपदावरून हटवून UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं असं म्हटलं आहे.सोबतच UPAचं पुनर्गठन व्हावं असंही संजय राऊत म्हणालेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात झालेला प्रयोग हा उत्तम प्रयोग असल्याचे ते म्हणाले. या प्रयोगाकडे संपूर्ण देश पाहतो आहे असे राऊत म्हणाले.काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारायला हवे असेही ते म्हणाले.

राऊत म्हणाले की, आम्ही आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडलेलो आहोत. आम्हीच नाही, तर अकाली दल देखील एनडीएमधून बाहेर पडला आहे. ममता बॅनर्जी तर यूपीएमध्येही नाहीत आणि एनडीएमध्येही नाहीत. देशात असे अनेक पक्ष आहेत जे यूपीए किंवा एनडीएत नाहीत असे सांगत, आता हे पक्ष यूपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे’.

संयुक्त पुरोगामी आघाडी मजबूत असल्याखेरीज काँग्रस पक्ष मजबूत होणार नसल्याचे राऊत म्हणाले. यूपीएला मजबूत करायचे असल्यास जो नेता अॅक्टीव्ह आहे आणि ज्या नेत्याच्या नावावर विरोधकांमध्ये सहमती असेल अशा नेत्याच्या हाती यूपीएचे नेतृत्व दिले गेले पाहिजे, असे राऊत म्हणाले. त्यावर असा कोण नेता आहे, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर सध्या तरी केवळ शरद पवार यांचेच नाव समोर येत आहे, असे उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!