Share

वीरेंद्र सेहवागचे असेही एक टि्वट; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा वापरला फोटो

Published On: 

🕒 1 min read

रायपुर : रायपुर येथे सुरु असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमधील उपांत्या सामन्यानंतर भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एक टि्वट केले होते. या टि्वट मध्ये सेहवागने पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो वापरत एक संदेश लिहीला आहे.

रोड सेफ्टी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने संघाने बुधवारी वेस्ट इंडिजवर अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकामध्ये विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजला फक्त चार धावा काढता आल्या आणि भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या विजयानंतर सेहवागने केलेल्या टि्वटमध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान इम्रान यांचा फोटो वापरत ‘शेवटच्या क्षणी थोडं धकधक नक्कीच होत होतं, पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही….’ असे लिहीले आहे.

बुधवारी रोड सेफ्टीसाठी क्रिकेट सामन्यांच्या या स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बुधवारी वेस्ट इंडिजवर अखेरच्या षटकात १२ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकामध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी १७ धावांची गरज होती. पण इरफान पठाणने यावेळी फक्त चार धावा देत एक बळी मिळवला आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. यामध्ये भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकाचा समावेश होता. त्याचबरोबर युवराज सिंगनेही यावेळी षटकारांचा वर्षाव करत वादळी खेळी साकारली होती. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २०६ धावांवर समाधान मानावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!