बीड : जिल्हा नियोजन समितीची रखडलेल्या निवडी अखेर बुधवारी (दि.१७) घोषित झाल्या. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली. समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असून शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही स्थान मिळाले आहे. दरम्यान, यात महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांना संधी देण्यात आली आहे. मात्र, एकाही महिला पदाधिकाऱ्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.
राज्याच्या नियोजन विभागाने एका आदेशाद्वारे बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर केली. विधीमंडळ सदस्यांमधून दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन नामनिर्देशित सदस्यांसह निमंत्रित ११ जणांची समितीवर वर्णी लागली. विधीमंडळ सदस्यांतून राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांची निवड झाली.
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्य म्हणून वाल्मिक कराड व अभयकुमार ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली. बाबूराव पोटभरे, शेख समशेर शेख शब्बीर, सयाजी शिंदे, विठ्ठल सानप, राजेंद्र लोमटे, सुनील वाघाळकर, महादेव धांडे, दादासाहेब मुंडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, वैजनाथ सोळंके यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समितीत स्थान देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
