Share

कोरोनामुळे काम मिळत नसल्याने युवकाची आत्महत्या

Published On: 

नांदेड :  नापिकी आणि कोरोनामुळे कामधंदा मिळत नसल्याने युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार लोहा तालुक्यात उघडकीस आला आहे. सायाळ गावातील शेख ख्वाजा शेख गफार (वय ३२) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शेख ख्वाजा शेख गफारच्या वडिलांच्या नावे दीड एकर शेत आहे. सतत नापिकी, कामधंदा मिळत नसल्याने घर कसे चालवावे या काळजीने शेख ख्वाजा यांनी १५ रोजी रात्री १० वाजता घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हसीनाबी ख्वाजा शेख यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत खासगी कर्ज व ८० हजारांची म्हैस विकावी लागल्याने तुप्पा (ता.नांदेड) येथील रामराव माणिका टिपरसे (५२) यांनी कंटाळून शेतात विष घेऊन जीवन संपवले. त्यांना उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. १६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संतोष टिप्परसे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तर, तिसरी घटना मुखेड तालुक्यातील चौंडी येथे घडली. तायाबाई दादाराव किजवे (६५) यांनी राहत्या घरी १५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्यांच्या वैद्यकीय कागदपत्रांवरून मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!