🕒 1 min read
इंदोर : मुंबई क्रीडारसिकासाठी काही दिवस फारच आनंदाचे गेले आहेत. क्रिडा क्षेत्रात मुंबईच्या संघाने एकामागोमाग दैदीप्यमान कामगिरी केली आहे. आयएसएल असो वा विजय हजारे करंडक दोन्हीकडे मुंबईच्या संघाने जोरदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. आता महिला वरिष्ठ खेळाडूंच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत मुंबईच्या संघाने अवघ्या चारच चेंडुत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या वरिष्ठ खेळाडूंची एकदिवसीय करंडक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत बुधवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबईच्या महिला संघाने नागालँडच्या संपुर्ण संघाला फक्त १७ धावांवर माघारी तंबुत धाडले. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने विजयाचे लक्ष्य फक्त चार चेंडूत एकही गडी न गमवता पार केले.
Unbelievable Womens Senior One Day Trophy (2020-21) game in Indore.
Nagaland 17 (17.4)
Mumbai chased down the total in only 4 balls! pic.twitter.com/of0oKp6ryQ
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) March 17, 2021
इंदोर येथील होळकर मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईच्या गोलदांजानी धडाकेबाज कामगिरी केली. या सामन्यात कर्णधार आणि जलद गोलंदाज सायली सातघरेने अवघ्या पाच धावा देत सात गडी बाद केले. नागालँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. अवघ्या १७.४ षटकात नागालँडचा संपुर्ण संघ १७ धावांवर तंबुत माघारी परतला.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन’
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- ‘मातोश्रीपर्यंत जातात असे बडे नेते अडकणार म्हणून सचिन वाझेंच्या जीविताला धोका’
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
- येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
