Share

महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला

Published On: 

जळगाव – जळगाव महापौर, उपमहापौर निवडणुकीवरुन राजकारण चांगलेच तापले होते. जळगाव महापालिकेत काही वेळापूर्वी ऑनलाइन पद्धतीने जळगाव महानगरपालिकेचे महापौर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर भाजप मधील बंडखोर उमेदवार उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले होते.भाजपातर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत जयश्री महाजन यांना ४५ मते पडली तर कापसे यांना अवघी ३० मते मिळाली. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत देखील असेच चित्र कायम राहिले.

या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खा. विनायक राऊत यांनी विशेष लक्ष दिले होते. दरम्यान, हा पराभव भाजपनेते गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या अडीच वर्षापासून पालिकेत भाजपाचाच महापौर होता. परंतु आता भाजप नगरसेवकांच्या एका गटाने बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या 57 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक हे शिवसेनेत सामील झाले,त्यामुळे या निवडणुकीत सांगली पॅटर्न राबवल्याचे चित्र दिसून आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!