Share

‘मातोश्रीपर्यंत जातात असे बडे नेते अडकणार म्हणून सचिन वाझेंच्या जीविताला धोका’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आणि पोलीस दलातील फेरबदलानंतर राजकीय वातावरण शांत होईल, असं सरकार वाटत असलं तरी विरोधक मागे हटायला तयार नाहीत. सचिन वाझे आणि परमवीर सिंह ही केवळ प्यादी आहेत. त्यांचे राजकीय सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिल्लीत केली होती.

त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी सचिन वाझेंच्या जीविताला धोका असल्याचे धक्कादायक विधान केले आहे. ‘एनआयएने सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाहीतर सचिन वाझेंचा मनसुख हिरेन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यांच्या जीवाला धोका असून एनआयएने त्यांना संरक्षण द्यावे. येत्या काही दिवसांत मातोश्रीपर्यंत जातात अशा महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचे नाव या प्रकरणामध्ये समोर येणार आहे. बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती ठाकरे सरकारला आहे, असे धक्कादायक विधान खासदार नवनीत राणा यांनी केले.

‘मनसुखे हिरेन यांच्या प्रकरणात सचिन वाझे हे तपास करत होते. त्यांना एनआयएकडून चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांची चौकशी झाली म्हणून मुंबई पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिस आय़ुक्त पदावरून हटविण्यात आले. याप्रकरणामागील सत्य सचिन वाझे सांगतील, अशी भीती ठाकरे सरकारला आहे. त्यामुळे राज्यात खूप मोठा राजकीय भूकंप देखील होऊ शकतो’, असेही राणा म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!