🕒 1 min read
अहमदाबाद : आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे. बुमराहची होणारी भावी बायको कोण आहे? याबाबत सुरुवातीला दोन नावांची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हिच्याशी लगीनगाठ बांधली आहे.
सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, नुकतेच बुमराह याने आपल्या इंस्टाग्राम वरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून यावर शिक्कामोर्तब केल आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बुमराहने आपले नाव मागे घेतले होते. आता आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बुमराह तयार झाला आहे. लग्नानंतरच्या ब्रेकनंतर तो या महिन्याच्या शेवटी मुंबई मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहने सुरुवातीचे तीन सामने खेळले. त्यानंतर तो बीसीसीआयची परवानगी घेऊन बायो बबलमधून बाहेर पडला.
टी-20 मालिकेनंतर आता उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. बुमराह या मालिकेतही नसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लग्नाच्या ब्रेकनंतर बुमराह आता 26 ते 28 मार्च दरम्यान मुंबई इंडियन्समध्ये दाखल होईल. चेन्नईला जाण्यापूर्वी तो एका आठवड्यासाठी क्वारंटाईन असेल.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
