Share

गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- टिआरपी घोटाळ्याचे तपास अधिकारी सचिन वाझे एनआएच्या अटकेत असताना रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? त्यांच्यासह रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपी म्हणून किती काळ टांगती तलवार ठेवणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.

गोस्वामी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का, प्रकरणाचा तपास किती वेळात पूर्ण करणार हे आज सुनावणीवेळी स्पष्ट करावे, असेही न्यायालयाने पोलिसांना बजावले आहे.या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करणाऱ्या याचिका एआरजी कंपनी व गोस्वामी यांनी केल्या आहेत. त्याविषयी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी दाखल एफआयआर आणि आरोपपत्रातही नाव नसताना अशाप्रकारे एखाद्यावर टांगती तलवार लावून ठेवणं योग्य आहे का? गेल्या तीन महिन्यांत जर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तुमच्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही तर मग आम्ही त्यांना दिलासा का देऊ नये? असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला.

याप्रकरणी विशेष सरकारी वकीलांकडे कोणतीही ठोस उत्तर उपलब्ध नसल्याबद्दल न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच ही सुनावणी आटोपती घेत अर्णब गोस्वामींना दिलेला दिलासा तूर्तास कायम ठेवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!